बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊन नसतं तर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही – उद्धव ठाकरे

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या जनेतला संबोधित करत आहेत. आजपासून चौथा लॉकडाऊन सुरू झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्राशी संवाद साधत आहेत.

आपण मार्चमधून खबरदारी घेतली नसती तर रुग्णसंख्या किती वाढली असती आणि किती मृत्यू झाले असते, याचा विचार करुन अंगावर काटा येतो. लॉकडाऊनचा नक्कीच उपयोग झाला असल्याचं उद्धव म्हणाले.

युद्ध शस्त्राने लढतात, पण या युद्धात शस्त्र नाहीये. सोशल डिस्टन्सिंग हेच शस्त्र आहे. आपल्याकडे याचे काहीही उत्तर नाही, फक्त अंतर ठेवणं एवढंच उत्तर आहे, अस उद्धव म्हणाले. मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. मात्र जर लॉकडाऊन केलं नसतं हे आकडे जास्त असते, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात 50 हजार उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यात ५ लाख मजूर काम करत आहेत. हळूहळू उद्योग आता सुरू होतील, असंही त्यांनी सांगितलं. तर विधान परिषदेची निवडणूक या कठिण परिस्थितीत बिनविरोध होऊ दिली यासाठी त्यांनी सर्वांचे आभार आभार मानले.

ट्रेडिंग बातम्या-

माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही- पृथ्वीराज चव्हाण

अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

महत्वाच्या बातम्या-

कोरोना रूग्णांसाठी मुंबईत 1 हजार बेड्सचं रूग्णालय; सरकारकडून महापालिकेकडे सुपूर्द

मतदानादरम्यान मजुरांना गावी परतण्याची सोय करता, आपत्ती काळात विरोध कशाला- सदाभाऊ खोत

मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More