बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला”

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच समोर येत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे.

जर माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर काय करायचं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर विरोधकांना नाही पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नकोय याचं मला दु:ख, आश्चर्यच नाही तर धक्का बसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सुरत किंवा दुसरीकडे कुठुन बोलण्यापेक्षा माझ्या समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायलाही तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मला कोणताही मोह नाही. मी शिवसेना पक्षप्रमुखांचा मुलगा आहे. मला समोर येऊन सांगा मी माझा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तयार ठेवला आहे. आज सध्याकाळी मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

…आणि निरोपाच्या भाषणात उद्धव ठाकरे चक्क गोष्ट सांगायला लागले!

“आज संध्याकाळी मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतोय”

उद्धव ठाकरे त्यांची भूमिका स्पष्ट करणार, ट्विट करत म्हणाले…

मोठी बातमी! एकनाथ शिंदेनी ट्विट करत केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा

‘उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरु’, नवनीत राणा कडाडल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More