बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना संदर्भात देशासाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर!

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महमारीने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. मागील काही महिन्यांत कोरोना व्हायरस खूप वेगानं फैलावत होता. परंतु आता याचा फैलाव कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता देशासाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना फैलावाचा वेग दर्शवणारी ‘R-Value’ गेल्या काही आठवड्यात कमी झाल्यांच पाहायला मिळालं आहे.

ऑगस्ट महिन्यात देशाची R-Value 1.17 एवढी होती. परंतु हाच आकडा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत मोठ्या प्रमाणात घसरला आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत देशाची R-Value 0.92 एवढी नोंदवली गेली आहे. देशासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र आणि केरळ राज्याची R-Value देखील 1 पेक्षा कमी आहे. तसेच दिल्ली आणि पुण्याची R-Value देखील 1 पेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे. यामुळे ही देखील दिलासादायक गोष्ट आहे.

दरम्यान, काही शहरांमध्ये अद्याप कोरोनाचा फैलाव कायम आहे. मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि बंगळुरू या शहरांमध्ये R-Value 1 पेक्षा अधिकच आहे. मुंबईची R-Value 1.09, चेन्नईची 1.11, कोलकत्त्याची 1.04 तर बंगळुरुची 1.06 एवढी आहे.

थोडक्यात बातम्या –

ओवैसींच्या दिल्लीतील निवासस्थानाची जमावाकडून तोडफोड, 5 जण पोलिसांच्या ताब्यात

तालिबानी सत्तासंघर्ष टोकाला, दोन्ही सर्वोच्च नेेते गायब

…मग राज्यपालांना एवढा अधिकार नाही का?- चंद्रकांत पाटील

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहांची घेणार भेेट!

भाजपच्या ‘त्या’ 12 निलंबित आमदारांना निवडणुक आयोगाचा मोठा दिलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More