Top News महाराष्ट्र मुंबई

दिलासादायक! अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग

Close-up Of Woman Having Video Chat On Digital Tablet In Classroom

मुंबई | मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये, म्हणून येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरु केले जाणार आहेत.

मराठा आरक्षणाचा निर्णय आणखी 4 आठवडे लांबणीवर पडल्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार?, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार? याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात होतं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला दिलासा मिळावा आणि विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेचा अभ्यासक सुरु करता यावा यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमाद्वारे शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिलीये.

या माध्यमातून विशेषत: विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील सर्वाधिक घेण्यात येणारे विषय किंवा बंधनकारक असलेल्या विषयांच्या तासिका उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

तसंच ऑनलाईन तासिका कोणत्या व्यासपिठावर, कशा आणि किती वेळासाठी उपलब्ध होतील यासंदर्भातील माहिती लवकरच देण्यात येणार आहे, असही शिक्षण विभागाने स्पष्ट केलंय.

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले…

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही- अशोक चव्हाण

सर्व सामान्यांच्या रेल्वे प्रवासात राजकारण करू नका; गृहमंत्र्यांचे आवाहन

“हिंमत असेल तर अनाधिकृत हॉटेलं तोडून दाखवा”

मुंबई- विनामास्क फिरणाऱ्यांकडून पालिकेने वसूल केला ‘इतक्या’ लाखांचा दंड!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या