देश

राम मंदिर नाही तर मोदी पण नाही- कम्प्यूटर बाबा

लखनौ | राम मंदिर नाही तर मोदी पण नाही, असं म्हणत प्रसिद्ध कम्प्यूटर बाबा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करत आहेत. ते लखनौ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या प्रचारासाठी आले होते.

कम्प्यूटर बाबांनी मोदींवर राम मंदिराच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करत लखनौमधील काँग्रेस उमेदवार आचार्य प्रमोज कृष्णम यांना पाठिंबा दिला आहे.

मोदींनी राम मंदीर निर्माण आणि गंगा स्वच्छ करण्याचे वचन दिले होते. मात्र त्यांनी घोषणापत्रात साधे गौमाताचे नावदेखील घेतले नाही म्हणून आम्ही मोदींवर नाराज आहोत, असं कम्प्यूटर बाबांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मोदींना हिंदू धर्माप्रती कोणत्याही प्रकारची आस्था नाही, ते केवळ प्रचार तंत्र म्हणून धर्माचा वापर करत आहेत, अशी टीका कम्प्यूटर बाबांनी मोदींवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-जेट एअरवेजनंतर आता एअर इंडियाही अडचणीत येण्याची शक्यता!

-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूंनी केलं लग्न

-रोमॅंटिक गाण्याप्रकरणी माफी मागा; शिवसेनेची अमोल कोल्हेंकडे मागणी

-मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मोदी ‘एक्सपर्ट’- प्रकाश आंबेडकर

-मी लहानपणी कोंबड्यांची अंडी विकायचो, हे दरवेळेस सांगत फिरु का?- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या