बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलीच्या चारित्र्यावर प्रहार, संतप्त स्मृती इराणींचा काँग्रेसला थेट इशारा

नवी दिल्ली | भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांच्या मुलीचा गोव्यात (Goa) बेकायदेशीर बार (Restaurant and Bar) असून, पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी (Narendra Modi) आणि भाजपच्या केंद्र सरकारने त्यांना मंत्रीमंडळातून हाकलून लावावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रसार माध्यमप्रमुख आणि प्रचारप्रमुख पवन खेडा (Pawan Kheda) यांनी केली आहे. यावर आता स्मृती इराणी चांगल्याच भडकल्या आहेत.

स्मृती इराणी यांच्या मुलीने हे आरोप फेटाळले आहेत. त्यांचे वकील किरत नागरांनी (Kirat Nangra) देखील सर्व आरोप फेटाळले आहेत. नागरा म्हणाले, त्यांच्या अशील या सिली सोल्स (Silli Solse) नावाच्या रेस्टॉरंटच्या मालक आहेत. त्या त्याचे संचालन करतात. स्मृती इराणी यांनी हे सर्व आरोप फेटाळत लावत आता पुढील लढाई आपण न्यायलयात लढू असा काँग्रेस (INC) पक्षाला इशारा दिला.

उत्पादन शुल्क (Excise Duty Department) विभागाने इराणी यांच्या मुलीला कारणे दाखवा (Show Cause) नोटीस पाठविली आहे. तसेच नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यावर दबाव आणला जात असून त्याची कथितरित्या बदली करण्यात येत आहे. ही माहिती आम्ही माहितीच्या अधिकारात (Right to Information) मिळविली आहे, असे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. इराणींच्या मुलीने बनावट दस्तावेज बनवून बार लायसन्स मिळविले, असा आरोप खेडा यांनी केला.

नॅॅशलन हेराल्ड (National Herald) प्रकरणात 5000 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी मी आवाज उठविल्याने माझ्या मुलीला लक्ष्य केले जात आहे, असे इराणी म्हणाल्या. काँग्रेसने माझ्या मुलीच्या चारित्र्यावर प्रहार केला असून ती केवळ 18 वर्षांची आहे आणि ती प्रथम वर्षात शिकत आहे, असे इराणी म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या – 

‘घटना सर्वांसाठी सारखीच’, संजय राऊतांचा शिंदे सरकारला इशारा

काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार

‘शिवसेनेच्या अश्रुत हे सरकार वाहून जाईल’, संजय राऊत शिंदे सरकारवर बरसले

‘शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं कारण…’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

नीरज चोप्राचा चंदेरी विजय, वर्ल्ड चँपियनशिपमध्ये रचला नवा इतिहास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More