बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्थसंकल्प सादर करताय की कवितांचा कार्यक्रम?; काँग्रेसचा सीतारामन यांना सवाल

नवी दिल्ली | काश्मीर संदर्भातील कविता सादर केल्याने एक बिलीयन डॉलरचा तोटा भरून निघणार नाही, असा टोला काँग्रेसने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना लगावला आहे. केंद्रातील सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करत आहे. यावरून काँग्रेसने सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे.

सीतारामन यांनी मुख्य अर्थसंकल्प सादर करण्याआधी सितारामन यांनी काश्मिरी भाषेतील एक कविता सादर केली. यावरून काँग्रेसने अर्थसंकल्प मांडत आहेत की कवितांचा कार्यक्रम सुरू आहे, अशी बोचरी टीका केली आहे.

सीतारामन यांनी सादर केलेल्या कवितेवरून काँग्रेसच राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगील यांनी टीका केली आहे. पाच ऑगस्टपासून खासगी श्रेत्रातील एक लाख लोकांनी गमावलेल्या नोकऱ्या परत मिळणार नाहीत, असं शेरगील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प हा आर्थिक अडचणींवर उत्तर शोधण्यासाठी आहे की कविता आणि संवादांचं वाचन?, असा सवाल शेरगील यांनी केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

“आशिष शेलारांना टिंगलटवाळीशिवाय काही काम उरलं नाही”

…म्हणून मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या- 

शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार; मोदी सरकारचा संकल्प

शेतकरी आणि ग्रामीण भारतासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश- निर्मला सीतारामन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More