नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. त्यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं पोलिसांना लाठीचार करावा लागला. त्यामुळं तणाव निर्माण झाला आहे. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भारतातील शेतकरी कधीच हिंसाचार करणार नाही . या हिंसाचाराला जबाबदार फक्त काँगेस पक्ष आहे . कारण त्यांनी कधीच शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार केला नाही, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हटलं आहे.
तसंच, काँग्रेस मोदींचा तिरस्कारापोटी शेतकऱ्यांच्या आडून देशात हिंसाचार करत असल्याचा आरोप करत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपवर काँग्रेस काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“हा माणूस राजकारणामुळे हिंसेचे समर्थन करत आहे”
शेतकऱ्यांच्या लाठीचारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरून घेतल्या उड्या, पाहा व्हिडीओ
…अन् काहीतरी वेगळा डाव साधायचा, असा विचार केंद्र करत तर नाही ना- आदित्य ठाकरे
शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले….