महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

काँग्रेसचे सर्व आमदार जयपुरचा पाहुणचार घेऊन महाराष्ट्रात दाखल!

मुंबई |  महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या दुसऱ्या म्हणजेल आजच्याच दिवशी बुधवारी कॉंग्रेसचे सर्व आमदार जयपूरहून परतले आहेत. ते राजस्थानच्या जयपूरमधील रिसॉर्टमध्ये पाच दिवस मुक्काम ठोकून होते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू होताच त्यांनी महाराष्ट्रात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचल्याने कॉंग्रेसने आपले आमदार फुटू नये म्हणून सावध पावले टाकली होती. त्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना जयपूरला हलवण्यात आलं होतं. आमदारांची फोडाफोडी रोखण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आल्याचं बोललं जात होतं. आता मात्र महाशिवआघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या निर्णयापर्यंत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पोहचले आहेत.

सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर जयपूरमधून कॉंग्रेसचे आमदार मुंबईत परतले आहेत. आता ते आपापल्या घरी जाणार असल्याचं समजत आहे. मुंबईत परतल्यावर कॉंग्रेसच्या एका आमदाराने काँग्रेस पक्षाचे आमदार कुणाच्या गळाला लागणार नाहीत, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

कॉंग्रेसच्या 44 आमदारांच्या रक्तात पक्ष भिनला आहे. त्यामुळे कुणीच आम्हाला फोडू शकणार नाही. ज्यांना कॉंग्रेस सोडून जायचे होते ते आधीच गेले. आता पुढील निर्णयांबाबत आम्हाला कॉंग्रेसच्या राज्य नेतृत्वाकडून येत्या आठवड्यात कळवलं जाईल, असंही त्या आमदाराने स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या