मुंबई | देशावर कोरोनाचं भयान संकट आलेलं आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी आता मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. हा मदत निधी जमा होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन पंतप्रधान केअर फंड उघडला. मात्र एक फंड असताना दुसरा फंड उघडण्याची गरज होती का? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरूनच पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जानेवारी 1948 मध्ये राष्ट्रीय सहाय्यता निधी पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंडाची स्थापना केली. आतापर्यंत एकाही प्रधानमंत्र्यांना नवीन राष्ट्रीय निधी फंड सुरू करण्याची गरज वाटली नाही. पण #PMCaresFund सुरू करून नरेंद्र मोदी यांनी मात्र सेल्फ प्रोमोशन करण्याची संधी सोडली नाही, अशी टीका चव्हाण यांनी मोदींवर केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांनीही मोदींनी उघडलेल्या नव्या फंडाचा समाचार घेतला आहे. एक फंड मदत निधी जमा होण्यासाठी असताना खरंच दुसऱ्या फंडाची गरज होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान केअर फंडामध्ये अनेक दानशूर व्यक्तींनी घसघशीत मदत केली आहे. स्वयंसेवी तसंच सेवाभावी संस्था, सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती, उद्योगपती, खेळाडू तसंच कला क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी करोडोंची मदत केली आहे.
टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews
जवाहरलाल नेहरू यांनी जानेवारी १९४८ मध्ये राष्ट्रीय सहाय्यता निधी PM National Relief Fund स्थापन केला. आतापर्यंत एकाही प्रधानमंत्र्यांना नवीन राष्टीय निधी सुरू करण्याची गरज वाटली नाही. पण #PMCaresFund सुरू करून @narendramodi यांनी मात्र self-promotion करण्याची संधी सोडली नाही.
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 1, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
माझा नवराच मला समलैंगिक समजत होता- सनी लिओनी
“राज्याचा कारभार अजितदादा चालवतयात, उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हमध्ये बिझी”
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाविरोधात पावलं उचलायला उशीर का केलात? सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर
“इतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचं जगावर सावट”
Comments are closed.