बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात काॅंग्रेसला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवणार”

मुंबई | राज्यात महाविकासआघाडी सत्तेत आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षातील नेते आपापल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्वबाळाचा नारा देत आहेत. नाना पटोले काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काॅंग्रेस पक्ष वाढीसाठी नाना सतत राज्यभर दौरे करत आहेत. आताही नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

काॅंग्रसे पक्षाला महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. जातीय आणि धर्मांध शक्तीविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी पक्ष संघटनेच्या कार्यकारिणीत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. काॅंग्रेस पक्षाच्या नवनियुक्त पक्ष कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली.

केंद्रातील मोदी सरकारने त्यांच्या उद्योगपती मित्रांसाठी देशात तीन कृषी कायदे आणले आहेत. केंद्र सरकारच्या या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार आहे. देशभरातील शेतकरी या कायद्यांच्या विरोधात लढत आहेत. तीन कृषी कायदे रद्द होईपर्यंत आम्ही संघर्ष करण्याचा प्रस्ताव पारित केला आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या एकूणचं सर्व धोरणावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील महागाई जोरदार वाढली आहे. गॅस 900, पेट्रोल 100 , खाद्यतेल 200 रूपयांवर गेलं आहे. सर्वसामान्यांचं आणि युवकांचं भविष्य उद्धवस्त करण्यांचं काम मोदी सरकारनं केलं आहे, या शब्दात नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या 

“राज्यपालांनी सरकारला त्यांची चुक दाखवून दिली, नाहीतर…”

आई तू इतकी क्रूर कशी झाली?, वारंवार दूध मागितल्याने बाळाला आपटलं; लेकराचा जागीच मृत्यू

मुंबईला चारी मुंड्या चीत केलं तरी कोलकाताच्या कर्णधाराला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड

“महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे तरच…”

‘पोलिसांनी मला राहत्या घरी कोंडलं’; सोमय्या मुंबई पोलिसांविरोधात तक्रार करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More