बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं काँग्रेसकडून ‘खास’ आयोजन!

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 17 सप्टेंबरला वाढदिवस असतो. मोदींनी आपल्या वयाची 70 वर्ष पुर्ण करत 71 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. भाजपकडून मोदींच्या वाढदिवसाचं देशभरात जोरदाररित्या साजरा करणार आहेत. विरोधी पक्ष काँग्रेससुद्धा पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करणार आहे. मात्र, देशातील वाढत्या बेरोजगारीचा मुद्दा पुढं करत काँग्रेस वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे.

युवक काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी काँग्रेसकडून देशभरात विवीध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणूकीत दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. पंतप्रधान मोदींना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देत युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही.बी. यांनी या दिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे.

2 कोटी रोजगाराचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सत्तेवर आले आहेत. मात्र, आजकाल पंतप्रधान मोदी या विषयावर गप्प आहेत. देशातील रोजगारीचा दर 2.4 टक्क्यांवरून 10.3 टक्क्यांवर गेला आहे. देशातील युवकांना रोजगार देण्यात मोदी अपयशी ठरले आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदींवर युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी केली आहे.

ज्या व्यक्तीनं हम दो हमारे दो च्या अंतर्गत देशातील तरूणांना बेरोजगार केले आहे. म्हणून देशभरात 17 सप्टेंबरला युवक काँग्रेस पंतप्रधान मोदींचा वाढदिवस हा असा टीकात्मक रित्या साजरा करणार आहे. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा मागील दोन वर्षापासुन करत आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या –

आर्या खरंच गायकाला डेट करते का?; आर्या आंबेकरचा खुलासा

“महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या मग भागवतांच्या का नाही?”

“उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होईल”

तालिबान्यांमध्येच तांडव! नव्या सरकारमध्ये फूट, उपपंतप्रधानांनी काबूल सोडलं

“…तर मग आपले पोलीस सरकारने 100 कोटी मोजायला बसवलेत का?”

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More