‘अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना बांबूने झोडा’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री गिरीरीज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरकारी अधिकाऱ्याबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्यामुळे त्यांच्यावर देशभरातून टीका होत आहे. बिहारमधील एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
जर एखाद अधिकारी तुमचं म्हणणं ऐकत नसेल तर बांबू उचला आणि त्याला झोडा, असं वादग्रस्त वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केलं आहे. त्यासोबतच लहान-लहान गोष्टी मला सांगण्याची आवश्यकता नाही. हा तुमचा अधिकार आहे. जर तुमच्या अधिकाराची पायमल्ली होत असेल तर मी तुमच्यासोबत उभा असल्याचं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.
आम्ही कोणत्याही अधिकार्याला चुकीचं काम करण्यास सांगत नाही. तसेच कोणत्याही अधिकाऱ्याचे बेकायदेशीर कृत्य सहनही देखील करुन घेत नाही. यामुळे तुमच्या लहान-सहान गोष्टी माझ्यापर्यंत आणू नका, असंही गिरीराज सिंह म्हणाले.
दरम्यान, बिहारमधील बेगुसराय येथे त्यांची सभा चालू होती. त्यावेेळी स्थानिक लोकांनी आपल्या अडी-अडचणी गिरीराज यांना सांगितल्या. तेव्हा काही स्थानिकांनी त्यांच्याकडे एका शासकीय अधिकाऱ्यांची तक्रार केली. त्यावर बोलताना गिरीराज सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मात्र या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी
आजच्या काळातील ‘झाशीची राणी’; ‘या’ व्हिडीओमुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव
रिलायन्स नंतर आता ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार मोफत लस
बाबो! 8 वर्षीय मुलानं ‘ही’ गेम खेळून मिळवलेत तब्बल 24 लाख; सविस्तर वाचा…
उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी काढुन दाखवावी- नारायण राणे
Comments are closed.