बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनानंतर आता डेंग्यूचा शिरकाव; ‘या’ ठिकाणी वाढतंय संक्रमण

नागपूर | सध्या कोरोनानं देशात खळबळ माजवली आहे. कोरोनातून सावरता सावरता नाकीनऊ येत असतानाच आता दुसरीकडे डेंग्यूचं संक्रमणही डोकं वर काढत आहे. डेंग्यूच्या होणाऱ्या संक्रमणानंही आता चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता नागपूरमध्ये डेंग्यूचा शिरकाव पाहायला मिळत आहे.

डेंग्यूच्य वाढत्या शिरकावामुळे नागपूर महापालिकेनं याची दखल घेेत डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिम राबवली. या राबवलेल्या मोहिमेअंतर्गत शहरात 383 घरांमध्ये डेंग्यूच्या अळी आढळून आल्या. यासाठी मनपाद्वारे 8689 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणामध्ये 1784 घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात 133 कुलर्समध्ये डास अळी आढळून आल्या आहेत.

या सर्वेक्षणामध्ये 212 जणांच्या रक्तांच्या नमून्यांची चाचपणी करण्यात आली. यामध्ये 85 लोकांना ताप असलेले रूग्ण आढळून आले. अनेक ठिकाणी सर्वेक्षण करुन विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. महापालिकेनं या डेंग्यूवर उपाययोजनांसाठी सतर्कता जागरुक केली आहे.

दरम्यान, आरोग्याचा प्रश्न हा अधिक महत्त्वाचा असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करता कामा नये, त्यामुळे आवश्यक ते नियम बाळगण्याची नागरिकांना गरज आहे. साथ पसरणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य टीमद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरांमध्ये सर्वेक्षण केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

पुण्याला झिका व्हायरसचा धोका?, पुण्यातील ‘इतक्या’ गावांना संभाव्य धोक्याचा इशारा

आनंदाची बातमी! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

पाकिस्तानच्या अर्शदला पदक मिळालं असतं तर मलाही आनंद झाला असता- नीरज चोप्रा

‘पंतप्रधान मोदींनी माझ्या लोकप्रियतेमुळेच टिकटाॅकवर बंदी आणली’

“मराठीपेेक्षा हिंदी चित्रपटांना झुकतं माप देता, कुठं आहेत शाखरूख, सलमान?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More