धक्कादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग; आरोग्य यंत्रणेची कबुली
जळगाव | महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसुन येत आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणी कोरोना संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णसंख्येत आता वाढ झाली असताना दुसऱ्या लाटेतील कोरोना हा समुहसंसर्ग असल्याची कबुली आरोग्य यंत्रणेनं दिली आहे.
मागच्या महिनाभरापासुन जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. आणि याच पार्श्वभुमीवर आरोग्ययंत्रणेनं हा समुहसंसर्ग असल्याची कबुली दिल्याने आता चिंतेचं वातावरण पसरलं आहे. जिल्ह्यात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात राजकीय सोहळे, लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम पार पडले.
जळगावमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमातुन मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला असल्याचा अंदाज प्रशासनाकडुन व्यक्त केला जात आहे. अचानक रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाकडेही तेवढं मनुष्यबळ नसल्याने रूग्णांची गैरसोय होत असताना पाहायला मिळत आहे.
शासकीय रूग्णालयातील खाटा आता कमी पडत असल्याने लोकं खासगी रूग्णालयाकडे वळत आहेत, पण तिकडेही सारखीच परिस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. RTPCR चाचणी केल्यानंतर त्या चाचणीचा अहवाल येण्यासाठी भरपुर वेळ लागत आहे, जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत रूग्ण गावात मुक्तसंचार करत असल्यानेही कोरोनाचा प्रसार होत असल्याचं आरोग्य विभागाकडुन सांगण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या –
2 दिवसांत चक्क 4 टन आंब्याची आगाऊ नोंदणी; शेतकरी डॉ. केशव सरगर यांनी लढवली ‘ही’ शक्कल
मन हदरवून टाकणारी घटना, एकाच वेळी कुटुंबातील सगळ्यांचे मृतदेह सापडले एकाच घरात
अनुष्का शर्माच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे शुटींगवर परतल्यानंतर ती होतेय ट्रोल
राजेश टोपे यांचं महाराष्ट्रातील लाॅकडाऊन संदर्भात मोठं वक्तव्य; वाचा सविस्तर
निवडणुकीच्या प्रचारात भाजपने केली ‘ही’ घोडचूक; चूक समजताच व्हिडीओ हटवला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.