पुणे | कोरोना महामारीचं सावट गेल्या दोन वर्षापासून थैमान घालत आहे. कोरोना विषाणूची धास्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून रुग्णसंख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंही धडक दिली आहे.
कोरोना आणि कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं जगभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. राज्यभरातून तर धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे नागरिकही चिंतेत आहेत.
पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली आकडेवारी पाहून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या 5 हजार 521 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात 342 कोरोनाबाधित रुग्ण ॲाक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 46 आणि नॉन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 35 रुग्ण आहेत.
दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे, दिवसभरात शहरातील 6 हजार 333 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनावरही ताण निर्माण झाला आहे.
थोडक्यात बातम्या –
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर
शाळा बंद पण शिक्षण चालू! स्मार्टफोन नसल्याने विद्यार्थ्यांसाठी राबवला जातोय अनोखा उपक्रम
कोरोनातून लवकर बरं व्हायचं असेल तर ‘या’ गोष्टी खाण्याच्या टाळा
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता मुंबईत प्रथमच धावणार…
“मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही नामर्दपणे टीका केली”; संजय राऊत भडकले
Comments are closed.