बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनोरंजन क्षेत्रात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे ‘हे’ दोन मोठे कलाकार कोरोनाच्या जाळ्यात!

मुंबई | कोरोना विषाणूचा कहर देशभरात सतत वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस हे प्रकरण अधिक गंभीर बनत चालले आहे. गेल्या आठवड्यापासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अभिनेता रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, निर्माते संजय लीला भन्साळी, आणि आता अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेते आशिष विद्यार्थी यांचादेखील या यादीत समावेश झाला आहे. तारा आणि आशिष विद्यार्थी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, तारा सुतारियाला कोरोना संसर्ग झाला आहे. नुकताच ताराने तिच्या आगामी ‘तडप’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तारासमवेत अहान शेट्टी महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट 24 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच दरम्यान, तिला कोरोनाची लागण झाल्याचे कळले आहे.

पडद्यावर आपल्या नकारात्मक भूमिकेने चाहत्यांना मुग्ध करणाऱ्या आशिष यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. आशिष यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. अभिनेते आशिष विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर दिल्लीच्या साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर याबाबतची माहिती देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तर, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी देखील स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान , इतकेच नाही तर अभिनेत्याने पुढे असेही म्हटले आहे की, मला हे संक्रमण कसे झाले हे माहित नाही. मी वाराणसीत, मुंबईत, दिल्लीत शूट करत होतो. मी सावध असायचो पण तरीही हे घडलं! म्हणूनच आपण सर्वांनी देखील आता खूप सावधगिरी बाळगली पाहिजे.

थोडक्यात बातम्या – 

खुशखबर! फक्त 1.11 लाखात घरी न्या किया सेल्टाॅस कार

ममता बॅनर्जींचा भाजपवर बूमरॅंग; दिला ‘हा’ मोठा धक्का

मोठी बातमी! पुण्यापाठोपाठ ‘या’ जिल्ह्यातील शाळा देखील 31 मार्चपर्यंत राहणार बंद

“पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या”

धक्कादायक! एकाच कुटुंबातील 5 जणांनी फाशी घेत संपवलं जीवन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More