महाराष्ट्र मुंबई

कोरोनाशी लढणाऱ्या आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई | कोरोनाशी लढणाऱ्या मुंबई पोलीस दलातील आणखी एका योद्ध्याचा मृत्यू झाला आहे. कुर्ला पोलीस ठाण्यात वाहूतक शाखेत कार्यरत असणाऱ्या शिवाजी सोनावणे यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई पोलिसांनी ट्विट करत शिवाजी सोनावणे यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. मुंबई पोलीस दलातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवाजी सोनावणे यांच्या निधनामुळे ही संख्या तीन झाली आहे.

शिवाजी सोनावणे यांना केईएम रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. अखेर सोमवारी त्यांचं निधन झालं.

कोरोनामुळे राज्य पोलीस दलातील पहिला बळी शुक्रवारी रात्री गेला होता. मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले 57 वर्षीय हवालदार नायर रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू पावले होते. त्यानंतर रविवारी आणखी एका हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर लाॅकडाऊन वाढवण्याविषयी अनिल देशमुख म्हणतात…

“लॉकडाउनचा कालावधी वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रात फसतील”

लॉकडाउन कुठे कडक आणि कुठे शिथिल करणार?; नरेंद्र मोदींनी केलं स्पष्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या