देश

“14 एप्रिलनंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवणार नाही”

नवी दिल्ली | भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवला जाणार की 14 एप्रिलला संपणार याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र पंतप्रधानांसोबत बैठकीत सहभागी झालेल्या बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी याबाबत खुलासा केला आहे.

पंतप्रधानांनी 14 तारखेनंतर लगेचच पूर्णपणे लॉकडाउन हटवणार नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर नरेंद्र मोदींनी आज लोकसभा आणि राज्यसभेत पाचपेक्षा जास्त सदस्य असणाऱ्या संसदेतील नेत्यांसोबत चर्चा केली. यावेळी नरेंद्र मोदींनी सर्वांना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार काय पावलं उचलत आहे यासंबंधी माहिती दिली.

कोरोनाच्या आधीचं आणि नंतरचं आयुष्य सारखं नसणार आहे, असंही मोदींनी म्हटलं असल्याची माहिती पिनाकी मिश्रा यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको”

…म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केलं अटक

महत्वाच्या बातम्या-

आव्हाडांना बडतर्फ करा अन्यथा लॉकडाऊन तोडून ठाण्यात घुसू; भिडेंच्या धारकऱ्यांची धमकी

कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

“लोकहो, घरात व्यायाम करा, ज्यांना त्रास आहे त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवा; आपल्याला युद्ध जिंकायचंय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या