महाराष्ट्र मुंबई

कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीम जयंती साजरी करू- रामदास आठवले

Loading...

मुंबई | कोरोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीमजयंती साजरी करूया. त्या आधी कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्याचा संकल्प करा. संयम ठेऊन घरीच थांबा आवाहन केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांनी केलं आहे.

कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

Loading...

दोन महिन्यांचे रेशन अन्नधान्य गरिबांना मोफत द्यावे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. आता खासगी उद्योजकांनी सीएसआर फंडातून गरिबांना मदत करावी असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी एक हजार 70 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करून गरिबांना नवसंजीवनी असल्याचं म्हणत आठवलेंनी निर्णयाचं स्वागत केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

कोल्हापूरमध्येही कोरोनाचा शिरकाव; राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 130 वर

घरात, रुग्णालयात की फोटो फ्रेममध्ये, कुठे राहायचं हे तुमच्या हातात- अमोल कोल्हे

महत्वाच्या बातम्या-

अन्नधान्याचा काळाबाजार होत असेल तर थेट मला फोन करा- दादा भुसे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 11 वाजता शरद पवार फेसबुकवरुन साधणार जनतेशी संवाद

शिवसेना, राष्ट्रवादी आपल्या आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीला देणार

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या