बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी कोविड टास्क फोर्सचा गंभीर इशारा, म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोना महासाथीच्या रोगानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलं आहे. कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत आहे. त्यामुळे कोरोना नियमांमध्येही शिथिलता पहायला मिळत आहे. अशातच आता चौथ्या लाटेचे संकेत तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत.

कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी उन्हाळ्यात कोरोना रूग्णसंख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. उन्हाळ्यात आर्द्रता जास्त असल्याने कोरोना जास्त वाढू शकतो, असं महाराष्ट्र टास्क फोर्सच्या सदस्यांनी म्हटलं आहे.

कोरोनाची चौथी लाट 22 जूनच्या आसपास सुरू होऊ शकते. ज्याचा प्रभाव 24 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी वर्तविली होती.

दरम्यान, कोरोनाची चौथी लाट येणार म्हटल्यावर नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाची तिसरी लाट नष्ट होत असताना चौथ्या लाटेविषयी संकेत मिळाल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

संजय राऊत यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद, नेमका कोणता गौप्यस्फोट करणार?

बायकोसाठी कायपण! …म्हणून युद्धाच्या संकटात भारतीयाचा मायदेशी परतण्यास नकार

“हे सरकार बेवड्यांसाठी पॉलिसी करू शकतं, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही”

धक्कादायक! मुंबईवर पुन्हा चक्रीवादळाचं संकट, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More