मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपच्या भांडणात आता मनसे उतरली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे सरकारविरूद्ध आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे.
मनसे नेते गजानन काळे यांनी अमोल मिटकरींच्या भाषणाचा जुना व्हिडीओ शेअर करत मिटकरींवर टीका केली आहे. मिटकरींनी व्हिडीओतील भाषणात उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शेतकऱ्यांची पोरं आम्ही तुमच्याकडं पाणी मागायला आलो तर तुम्ही म्हणता आम्ही धरणात मुततो, असं मिटकरी अजित पवारांना म्हणाले होते.
धरणात मुतायची मिजास केली म्हणून इथं आम्ही तुमचं राजकारण संपवलं, असंही त्या व्हिडीओत मिटकरी म्हणत आहेत. काळे यांनी मिटकरींचा व्हिडीओ शेअर करताना दलबदलू बाजारू असं कॅप्शन दिलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याबद्दलचे थोर विचार असंही काळेंनी तो व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी भर सभेत अजित पवारांची नक्कल केली होती. शरद पवारांवर जातीवादी राजकारण करत असल्याचा आरोप देखील राज ठाकरेंनी केला होता. त्यानंतर राज्यात मनसेविरूद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटला आहे.
पाहा ट्विट –
मटण करी जाणते राजे,दादा आणि बेस्ट मुख्यमंत्री यांच्याबद्दल थोर विचार मांडताना …😂 pic.twitter.com/3EHgVu7W74
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) April 21, 2022
थोडक्यात बातम्या –
शेतकऱ्यांनो… कामं उरकून घ्या! मराठवाड्यासह राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता
“नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या”
धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
मोठी बातमी! नवाब मलिकांना ईडीकडून जोर का झटका
“ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ आहेत आणि म्हणूनच ते…”
Comments are closed.