बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांवर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार”

रत्नागिरी | शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आपण आपले नेते मानत नाही, असं वक्तव्य केलं होतं. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. मी फक्त शिवसेना काय आहे हे सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं का म्हणायचं तर आपला राज्यात आपला मुख्यमंत्री आहे, असं अनंत गीते म्हणाले होते. गीतेंच्या या वक्तव्यावरून राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलंच शाब्दिक वाकयुद्ध रंगताना दिसत आहे.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी अनंत गीतेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राज्यात महाविकास आघाडीची स्थापना होत असताना अनंत गीतेंनी शरद पवारांच्या पायाला हात लावून पाया पडले होते, असा गौप्यस्फोट तटकरे यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीची स्थापना करताना शरद पवारांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे आभार मानले होते, असंही तटकरे यांनी म्हटलं आहे.

अनंत गीते मागील दोन वर्षापासुन अज्ञातवासात की विजनवासात गेले होते मला माहित नाही. परंतु महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होत असताना बांद्र्याच्या हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी गीतेंनी पवारसाहेबांना वाकून नमस्कार केला होता, त्या घटनेचा मी साक्षीदार आहे, असं तटकरे म्हणाले आहेत. आज मंगळवारी तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गीतेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. पवार साहेब देशाचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे जनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वच्छपणाने राज्यात काम करत आहेत. कोरोनासारख्या संकटाशी सामना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात करत असताना प्रशंसा केली जात असताना अडगळीत गेलेल्या नेत्यांना या सर्व कृतीचं भान राहीलं नाही, असा चिमटा तटकरे यांनी गीतेंना घेतला आहे.

 

थोडक्यात बातम्या –

शेतकरी जिंकले, SP सचिन पाटलांची बदली थांबली; बदलीसाठी झटणारा आमदार कोण?

बाबो! ‘या’ शुल्लक कारणामुळे महिलेने हाॅटेल कर्मचाऱ्यांना धो-धो धुतलं; पाहा व्हिडीओ

“देशातील मंदिरे पाडून मस्जिदी बांधल्या, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार”

अनंत गीतेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“माझं शरीर एक मंदिर, त्यात मला कुठलंही रसायन टाकायचं नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More