‘तुमचं वजन वापरून बघा काय मिळतंय का?’; आव्हाडांचा फडणवीसांना टोला
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यानी मांडलेल्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं आणि आक्रमकपणे टीका केली.
बेल्जियमने परत लॉकडाऊन केला आहे पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय. पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केली आहे. डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती आहे पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज जाहीर केलं आहे. ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत होतं आहे पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांना मदत मिळत आहे. एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यांना 800 युरोंपर्यंत मदत पोहचत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्यावर आमदार जितेंद्र आव्हाडांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं.
पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारने केल आहे. आपले केंद्र सरकार काय देणार आहे का ? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा तुमचं वजन वापरून काही मिळतं का ! , अशी टीका आव्हाडांनी केली आहे. एवढंच नाही तर पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी काही देशांची नावं घेेऊन परिस्थिती बद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर म्हणून फडणवीसांनी विदेशातील देशांचा संदर्भ दिला आहे. तर आव्हांडांनी यावर केंद्राला कैचीत पकडत भाजपवरच टीका केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो”
“पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोरोनाशी लढतोय, तरीही धीरोदत्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय”
“तुम्ही फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?”
मुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं
“रिषभ पंतला खेळताना पाहिलं की मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.