गडचिरोली | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असला तरी कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवायला सुरूवात झाली आहे. त्यात राज्यात आगामी सण, राजकीय पक्ष व संघटनांचे सभा व मिरवणुकीसारखे कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
राज्यात 2 एप्रिल रोजी गुडीपाडवा, 10 एप्रिल रोजी रामनवमी असे मोठे सण आहेत. यावेळी शोभायात्रा तसेच राजकीय सभा व मिरवणुका असे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यादृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात कलम 144 (Article 144) लागू करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 27 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे 10 एप्रिल पर्यंत गडचिरोलीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश लागू केले आहेत.
दरम्यान, जमावबंदीच्या कालावधीत शारिरीक इजा करता येईल अशी कोणतीही वस्तू तसेच दाहक पदार्थ बाळगण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे फलक लावणे, घोषणा देणे, आवेशपूर्ण भाषण करणे अशा गोष्टींवर देखील प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“… पण मला वाटतंय आशिष शेलारांच्याच मेंदूला लकवा आलाय”
पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, मुंबईत डिझेलचीही शंभरी पार; वाचा ताजे दर
“अजित पवारांचा घोटाळा सिद्ध झालाय, माझी भारत सरकारला विनंती आहे की…”
“मी आमदार खासदार जन्माला घालणारा माणूस, त्यामुळे तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी…”
Deltacron व्हेरियंटने टेन्शन वाढलं! तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, म्हणाले…
Comments are closed.