बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आजपासून संचारबंदी लागू; ‘या’ वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई 

पुणे | पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतील घातक डेल्टा प्लस विषाणू राज्यात पसरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे सरकारने दक्षता म्हणून प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पुणे शहरात संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील वाढत्या गर्दीवर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कारवाई करत आहेत. पुण्यात संध्याकाळी पाच ते सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय फिरता येणार नाही. पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी नाकांबदी केली असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केलं आहे.

जागोजागी नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि चेकिंगला प्राधान्य दिलं आहे. नाकाबंदीदरम्यान बेशिस्त आणि विनाकारण वाहनचालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे पोलिसांनी बेशिस्तांविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

दरम्यान, पुण्यातील कोरोना रूग्णांची आकडेवारी ही दिलासादायक आणि चांगली आहे. मात्र नागरिकांनी विनाकारण बाहेर पडत गर्दी केली तर आकडेवारी वाढण्यास वेळ लागणार नाही याची दक्षता पुणेकरांनी घ्यावी.

थोडक्यात बातम्या- 

“राज्यपाल धनखड भ्रष्टाचारी आहेत, त्यांना काढून टाकलं पाहिजे”

“महाराष्ट्रात दररोज 15 लाख लोकांचं लसीकरण करण्याची सरकारची तयारी”

धक्कादायक! 10 मिनिटांच्या अंतरात नर्सनं महिलेला दिले चक्क 3 लसीचे डोस

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

“अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेची समज नाही, म्हणून ‘कर्जाचे डोस’ देऊन काम चालू आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More