बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू

पुणे | राज्यातील पावसाचं (Rain) प्रमाण वाढत आहे. अशातच अनेक धबधब्यांना निसर्गरम्य, मनोहर रूप प्राप्त झालं आहे. समुद्रकिनारी पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. कुठे दरड कोसळ तर कुठे झाडं पडल्याचं पाहायला मिळालंय. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे आणि परिसरात पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे एक खबरदारी म्हणून  पुणे परिसरातील पर्यटनस्थळांवर कलम 144 लागू करून जमावबंदीचे ( curfew) आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वरील आदेश काढले आहेत.

हवोळी, मावळ ,मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर आणि आंबेगाव याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी याठीकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील. वेगाने वाहणाऱ्या पावसात उतरणं त्यात पोहणं. धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी (selfie) काढणं. यास प्रतिबंध करण्यात घालण्यात आला आहे. या गोष्टीचं पालन न केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.

तसेच गुरुवार, दि. 14 जुलै 2022 रोजी पुणे हद्दीतील सर्व बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीचा मोठा खुलासा

आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या…

‘द्रौपदी मुर्मूंकडून दुष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

मोठी बातमी! श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More