बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देश सध्या चारच लोक चालवत आहेत, दोघं विकतात तर 2 जण खरेदी करतात”

मुंबई | प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंजाब युनिव्हर्सिटीच्या सनी ओबेरॉय ऑडिटोरियममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राय त्यांनी देशातील प्रमुख मीडियासह काही संस्थांचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचंही म्हटलं आहे.

सध्या देशात जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे. जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे, असं म्हणत धार्मिक संस्था आणि संघटनांनाही त्यांनी लक्ष्य केलं आहे.

अरुंधती राय यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह देशातील दोन नामवंत उद्योजकांना लक्ष्य केलं. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याकडेच त्यांच्या म्हणण्याच्या रोख होता असं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

Netflix वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कंपनीने घेतला मोठा निर्णय

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा

मोठी बातमी! अभिनेत्री कंगना रनौतला न्यायालयाचा दणका

38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या ऑफर

“पावसात भिजून देखील राष्ट्रवादीचे 54 आमदारच निवडून आले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More