Top News पुणे महाराष्ट्र

मंत्रिपद हे मिरवण्याची गोष्ट नाही तर…- दत्तात्रय भरणे

Photo Credit- Facebook/ Dattatray Bharane

पुणे | मंत्रिपदे हे मिरवण्याची गोष्ट नाही. त्याचा उपयोग आपल्या भागातील लोकांना तसेच सर्वसामान्य माणसांना किती होतो? हा खरा महत्त्वाचा विषय आहे. मी खोटं-नाट वैगरे अजिबात करणार नाही. जे काही करेल ते प्रामाणिकपणे तुम्हा सर्वसामान्यांसाठी करेल, असं मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.

राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे 20 फेब्रुवारी रोजी इंदापूर दौऱ्यावर होते. यावेळी इंदापूर शहराजवळ असणाऱ्या माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या भिमाई आश्रमशाळेमधील लोक प्रबोधनकार अण्णाभाऊ साठे ग्रंथालय, गोजाई गार्डन आणि तुळसमाई गार्डन याठिकाणचं उद्धाटन भरणेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळीते बोलत होते.

तुम्ही सांगितलेली सगळी कामे मी करण्याचा प्रयत्न करेल. पण ती करताना ही सर्व कामे होतीलच असं सांगता येत नाही, कारण यात काही अडचणी असतात. काही मर्यादा असतात. काही गोष्टी कायद्यात बसवाव्या लागतात. यासाठी जी होणारी कामे आहेत, ती पुर्नत्वाला नेण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जी कामे होणार नाहीत त्यात अडचणी असतील. त्या मी नम्रपणे सांगेन, असा माझा वेगळा स्वभाव आहे, असं भरणेंनी सांगितलं.

दरम्यान, भिमाई आश्रम शाळेतील समोरील मैदानावर पेवर ब्लॉक बसवण्याची मागणी शाळेतील शिक्षक वर्ग कर्मचारी यांनी केली होती. त्यावर भाषणातच भरणे यांनी संस्थाचालक रत्नाकर मखरे आणि प्राचार्य यांना या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यासाठी किती खर्च होईल? असं विचारलं. त्यावर प्राचार्यांनी पंधरा लाख रुपये लागतील असं सांगितलं. यावर भरणे यांनी प्रस्ताव द्या, 20 लाख रुपये मंजूर करतो, असं आश्वासन दिलं.

थोडक्यात बातम्या-

…तर मी माझी खासदारकी फेकून देतो- खासदार संभाजीराजे

बाबो! एक थाळी संपवा अन् मिळवा एक तोळ सोनं, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

महाराष्ट्रसह देशातील ‘या’ राज्यातही कोरोनारूग्णांचा वाढला आकडा

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दिली ‘या’ तीन चेहऱ्यांना संधी

गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण वाढले, जाणून घ्या ताजी आकडेवारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या