देश

मोठी बातमी! दिल्लीच्या व्हीव्हीआयपी परिसरात स्फोट

Photo Credit- ANI

नवी दिल्ली | दिल्लीतील अब्दुल कलाम मार्गावर स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात परिसरातील चार ते पाच गाड्यांचं नुकसान झालं आहे.

हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अब्दुल कलाम मार्ग हा व्हीव्हीआयपी परिसर आहे. याठिकाणी अनेक देशांचे दुतावास आहेत.

सध्या पोलीस आणि सुरक्षायंत्रणा अब्दुल कलाम मार्गावर दाखल झाल्या असून तपासाला सुरुवात झाली आहे.

हा स्फोट कमी तीव्रतेचा असला तरी सध्या दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झालं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, तुम्ही एक इंचही मागे हटू नका- राहुल गांधी

“सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय काकांमुळे लागली”

सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे- देवेंद्र फडणवीस

“मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही”

“…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या