Top News

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांचा मोदी सरकारला अल्टिमेटम; घेतला हा मोठा निर्णय!

नवी दिल्ली | नऊ दिवस झाले तरी सरकार कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे.

गेल्या नऊ दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. पण सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. सरकार आम्हाला कमी लेखत आहे, असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकरी अत्यंत आक्रमक झाले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेत्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला.

सरकार कायद्यात दुरुस्ती करण्यास तयार आहे. एमएसपीवर कायदा बनवायलाही सरकार तयार आहे. पण आम्हाला हा कायदाच नकोय. हा कायदा रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे आम्ही सर्वानुमते 8 डिसेंबर रोजी बंद करण्याचा निर्णय घेतला असून देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश, मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची मोठी माहितीु

गांजा ड्रग्ज नव्हे तर औषध; भारतासह 27 देशांचं समर्थन, पाकिस्तानचा मात्र विरोध!

“फक्त नवरदेवाने लग्नाची घाई करुन होत नाही, घरच्यांनीही मनावर घेतलं पाहिजे”

“अमर, अकबर, अँथनी’ हिट!; रॉबर्ट सेठ हरला”

शेतकरी आंदोलनामुळे भाजपला मोठा झटका, ‘या’ राज्यातील सत्ता जाणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या