बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘टिंब टिंब टिंबचा अर्थ काय होतो? आता काय समजायचं माणसानं’; अजित पवारांची टोलेबाजी

मुंबई | महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने आज जागतिक पर्यटन दिन साजरा केला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारचं कौतूक केलं आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला होता.

पर्यटन दिनाच्या निमित्ताने अजित पवारांनी राजकीय पर्यटन करणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. पर्यटन विभागाची सर्वांगिण विकासाची संकल्पना ही अत्यंत चांगली आहे. पण ही संकल्पना कोणत्या पक्षातील नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी नाही, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे कोणचाही विकास होणार नाही, असंही अजित पवार म्हणाले. त्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला.

राजकीय पर्यटन वगळून बाकी सर्व पर्यटनासाठी आपण प्रयत्न करूया. त्यासाठी माध्यमांनी देखील आम्हाला साथ द्यावी. ब्रेकिंग न्यूज सोडून पर्यटनाची माहिती देणार असेल तर त्यांनाही आम्ही क्लिप देऊ. नको त्या क्लिप देणार नाही. चांगल्या क्लिप देऊ. नाहीतर महिला काय बोलली…, आमदार काय बोलला… नुसतंच टिंब टिंब टिंब देयचं असेल तर माणसानं काय समजावं, असं म्हणत अजित पवारांनी चांगलाच कार्यक्रम गाजवला.

दरम्यान, टिंब टिंब टिंबचा अर्थ काय होतो? जाऊद्या मला जास्त खोलात जायचं नाही, असंही जाता जाता टोला त्यांनी लगावला आहे. अर्थमंत्री म्हणून पर्यटन विकासाला निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तानात आता पुरूषांचेही हाल; तालिबान्यांनी घातल्या ‘या’ जाचक अटी

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रश्मी वहिनींचा बंगले घेण्यासाठी वापर केला”

‘…तर आम्ही न्याय कुणाकडे मागावा’; करूणा शर्मा प्रकरणावरून पंकजा मुंडेंची खोचक टीका

“भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला अन् मला दिल्लीत आशीर्वाद मिळाले”

‘…तर ‘त्या’ आमदारावर गुन्हा दाखल करावा’; संभाजी ब्रिगेडची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More