बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देवेंद्र भाऊ तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतलं तर…’, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला

नांदेड | गेल्या काही दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलेलं आहे. स्वर्गीय गंगाराम देशमुख (Gangaram Deshmukh) यांच्या स्मृतीग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजानिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण( Ashok Chavan) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना अशोक चव्हाणांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.

देवेंद्र भाऊ आमचं महाविकास आघाडीचं काम उत्तम चाललं आहे. तुम्ही थोडं अॅडजेस्ट करून घेतलं तर अजून उत्तम चालेल, असा टोला अशोक चव्हाणांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. लोकांच्या कल्पनेला आपण लगाम लावू शकत नाही. एखाद्या व्यक्तीमत्वासाठी आपण एकत्र आलो आहोत, असं अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे गंगाधरराव यांचा मृत्यू झाला, यावर आमचा विश्वासच बसत नाही. मला कोरोना झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाताना लोक शेवटचा निरोप देतायेत की काय, अशी परिस्थिती होती. स्वर्गीय गंगाधरराव देशमुख यांनी डोळा मारला की, काहीतरी गडबड झालेली असायची, अशी आठवण अशोक चव्हाणांनी सांगितली.

दरम्यान, राज्यातील राजकीय युद्ध गँग वॉर होऊ नये, राज्यातील राजकारणाचा स्तर घसरलेला आहे. तो राखला जावा आणि महाराष्ट्र हिताचे काम व्हावे, असं अशोक चव्हाणांनी कार्यक्रमात बोलून दाखवलं आहे.  देवेंद्र फडणवीस माझे शेजारी आहेत. फक्त भिंतच आडवी आहे. शेजारी आहोत लोकांनी कान भरू नयेत. आम्ही नेहमी बोलत असतो, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

S.T Strike| एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचं पुन्हा आवाहन, म्हणाले…

“राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचं गांडूळ बाहेर निघालं”

“इतक्या दिवसांनी राज ठाकरेंना अक्कल दाढ आली आहे”

WHOच्या दाव्याने खळबळ, कोरोनाच्या ‘या’ व्हेरिएंटने चिंता वाढली

‘राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…’; चंद्रकांत पाटलांकडून जाहीर कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More