बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून वाझेंना पोलिस दलात घेण्यात आलं’; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई | मनसुख हिरेन प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप सुरू आहेत, विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांकडे काही कागदपत्रे आणि पुरावे असतील तर ते सादर करावेत, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. एवढंच नव्हे तर शिवसेनेचे प्रवक्ते देखील होते. वाझे यांना यानंतर सस्पेंडही करण्यात आलं होतं. मात्र उच्च न्यायालयाचा निर्णय डावलून ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर वाझेंना जाणिवपूर्वक पदभार देण्यात आला. त्यांचा उपयोग होईल, म्हणून त्यांना पोलिस दलात घेण्यात आले. तो उपयोग कुठे होतो, हे आता दिसते आहे.

सचिन वाझे यांच्याविरोधात इतके गंभीर पुरावे असतानाही त्यांना पदावरुन दूर केलं जात नाही आणि खुद्द राज्याचे मुख्यमंत्री त्यांची बाजू घेताना दिसून येतात. राज्यात महाविकास आघाडी सरकारची केवळ नौटंकी सुरू आहे. घोषणा करायच्या आणि नंतर त्यावर मागे फिरायचं यातून राज्यातील सामान्य जनता आणि शेतकरी भरडून निघत असल्याची टीकाही त्यांनी यावेेळेस केली आहे

दरम्यान सचिन वाझे आणि शिवसेना यांचा कसलाही संबंध नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे. तसेच फडणवीसांनी कागदपत्रं दिली म्हणजे लगेच निकाल द्यायचा का?, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने निर्बंध लावण्याचा विचार- मुरलीधर मोहोळ

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; पायाला झालीय गंभीर दुखापत

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

‘सचिन वाझे जणू ओसामा बीन लादेन…’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

जागतिक अंतिम कसोटी सामना ‘लाॅर्डस’ नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More