Top News

अमित शहा ‘मातोश्री’वर जाणार होते, पण…; देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

मुंबई | कित्येक वर्षाची युती कायम रहावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर चर्चेस जाण्यास तयार होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी माझ्या एकाही दूरध्वनीला उत्तर न दिल्याने वाटा बंद झाल्या, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. महायुतीचं सरकार राज्यात यावं यासाठी आम्ही प्रयत्न केले. तसेच शिवसेना दूर गेल्याचे दु:ख आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

शिवसेना त्या काळात दररोज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलत होती. आता तर ते काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्यानेच चालतात. शिवसेनेसाठी आमचे दरवाजे कायम उघडे आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

अमित शहा यांच्याशी मुख्यमंत्रिपदाबाबत काय बोलणे झाले हे महत्त्वाचं आहे असं शिवसेना म्हणते, मात्र  युती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला शब्द महत्त्वाचा नाही का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या