बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील”

मुंबई | राज्यातील चर्चेत असलेल्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधी आणि सत्ताधाऱ्यांंमध्ये जुंपली आहे. विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनी यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या आरोपाचा दाखल देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. या प्रकरणामधील पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्यावर विमला हिरेन यांनी संशय घेत त्यांचं नाव घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर बोलताना सचिन वाझेंबाबत बोलताना विरोधकांवर टीका केली होती.कोणत्याही गुन्ह्यात आधी फाशी आणि नंतर तपास असं होऊ शकत नाही. सचिन वाझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय. हे चुकीचं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही. सचिन वाझेंकरता उद्धव ठाकरे वकील आहेत.सचिन वाझेंना डिफेंड करण्याचं काम उद्धव ठाकरेंना करावं लागतं. त्यामुळे त्यांना आता दुसरा वकील नेमण्याची आवश्यकता मला वाटत नाही. ज्यांच्या विरुद्ध इतके पुरावे आहेत त्यांना मुख्यमंत्री डिफेंड करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांकडे मनसुख हिरेन प्रकरणी काही कागदपत्रे आणि पुरावे असतील तर ते सादर करावेत. पोलिसांकडून त्या पद्धतीनं तपास करण्यात येईल, असं सांगत असताना फडणवीसांनी कागदपत्र दिली म्हणजे लगेच निकाल द्यायचा का?, अशी उपरोधिक टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने निर्बंध लावण्याचा विचार- मुरलीधर मोहोळ

दीड वर्षाच्या मुलाच्या पोटात आढळला मृत गर्भ, पुण्यातील ‘या’ रूग्णालयात पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; पायाला झालीय गंभीर दुखापत

‘ठाकरे सरकार’ हे महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘लबाड सरकार- देवेंद्र फडणवीस

सचिन वाझेंचं आणि शिवसेनेचं काय आहे जुन नातं?, मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More