“राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं”
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलं होतं. राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर अनेक मनसे (MNS) कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
मनसे कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र खरमरीत पत्र लिहिलं. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंनी राज्य सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे. राज्य सरकारविरोधात आम्ही लढतोय. राज ठाकरेंनी पण लढलं पाहिजे, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
दरम्यान, जे सरकार लांगूलचालन करतंय. ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्यात. हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर जे राजद्रोहाचा गुन्हा लावून खासदार, आमदारांना 12 दिवस जेलमध्ये ठेवतात त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं पूर्ण चुकीचं आहे, अशी टीका देखील देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…तर लोकांनी शरद पवारांना डोक्यावर घेतलं असतं’, निलेश राणेंची बोचरी टीका
“शरद पवार भाजपला घाबरतात, एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते”
“शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिला नाही”
प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन
‘…तर आज राज ठाकरे सुद्धा मुसलमान असते’; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ
Comments are closed.