Devendra Fadnavis : “अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही”
मुंबई | महाराष्ट्रातील अर्थसंकल्प अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यामुळे सध्या राज्यातील लोकांचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलं आहे. अधिवेशनाच्या पहिलेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Deendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) टीकास्त्र सोडलं आहे. अजित पवारांच्या शब्दाला किंमत नसल्याचं म्हणत फडणवीसांनी पवारांवर ताशेरे ओढले आहेत.
अजित पवार म्हणाले वीज कनेक्शन कापले जाणार नाही. पण आता कनेक्शन कापले जात आहेत. यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत. त्यामुळे अजित पवारांच्या शब्दाला काहीच किंमत राहिली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज देवेंद्र फडणीवस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे. उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनात ही चर्चा झाली पाहिजे, ही सरकारी पक्षाची भूमिका राहिली पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटलं.
थोडक्यात बातम्या –
देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल, पाहा ‘तो’ व्हिडीओ
“हे सरकार बेवड्यांना अन् दाऊदला समर्पित, यांचा खरा चेहरा आता समोर आला”
“राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याचा भाजपचा डाव”
रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर काय परिणाम?, वाचा सविस्तर
“तर मी प्रत्येक रशियन सैनिकासोबत सेक्स करेन”
Comments are closed.