“हे सरकार बेवड्यांना अन् दाऊदला समर्पित, यांचा खरा चेहरा आता समोर आला”
मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत भाजप नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे की दाऊदच्या सहकाऱ्यासोबत व्यवहार केल्याचा आरोप असलेले कोठडीत असूनही ठाकरे सरकारने राजीनामा घेतला नाही. मुंबईच्या खुन्यासोबत व्यवहार करणाऱ्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप अधिवेशनात संघर्ष करेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुंबई आमची अशी भाषा करणाऱ्या शिवसेनेनं नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे त्यांचाही खरा चेहरा आता समोर आला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेेनेवर केली आहे. तर हे सरकार दाऊद समर्पित सरकार आहे, असा घणाघात देखील देवेंद्र फडणवीसांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार फक्त बेवड्यांसाठी काम करतं. मद्य व्यवसायाला हवा तसा पाठिंबा देतं. हे सरकार बेवड्यांना समर्पित असलेलं सरकार आहे, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा या सरकारच्या काळात झाला असल्याचा दावाही फडणवीसांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर काय परिणाम?, वाचा सविस्तर
“तर मी प्रत्येक रशियन सैनिकासोबत सेक्स करेन”
“काय गोंधळ घालायचाय ते घालू देत, नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही”
“आता मी आलोय, तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही”
Corona : वनस्पतींपासून बनवण्यात आलेल्या ‘या’ लशीला सरकारची मान्यता
Comments are closed.