बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण प्रकरणावर गप्प का?- देवेंद्र फडणवीस

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. याप्रकरणावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुनावलं आहे. गृहमंत्री कुठे आहेत? छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर का बोलत नाहीत?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

रोज नववनवे फोटो आणि ऑडिओ क्लिपबाहेर येत आहे. अशा परिस्थितीतही पोलीस हातावर हात ठेऊन गप्प आहेत. पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरु आहे हे राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

त्या ऑडिओ क्लिपमधला आवाज नेमका कुणाचा आहे हे पोलिस का सांगत नाहीत किंवा पडताळून का पाहत नाही, असे सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारले आहेत.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. पण सरकार कायद्यात न बसणारं अधिवेशन घेत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

संजय राठोड प्रकरण असो की वीज कापण्याचं असो, विरोधी पक्ष आक्रमक राहील, असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिलाय.

थोडक्यात बातम्या-

“मोदी हे महान आहेतच त्याविषयी शंका घेण्याचं कारण नाही, पण…”

नाना पटोलेंचा राष्ट्रवादी, शिवसेनेला इशारा, म्हणाले…

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण!

घर बांधणं आता आणखी सोप्पं होणार; हसन मुश्रीफ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

चिंताजनक! नव्या कोरोनापासून शरिराच्या ‘या’ अवयवाला आहे सर्वाधिक धोका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More