बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तो व्यक्ती कोण?, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या किस्स्याची जोरदार चर्चा

मुंबई | राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईमध्ये सुरु आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी विरोधक आमनेसामने आले असून विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे. राज्य सरकारचा कारभार कसा सुरळीत चालू आहे, हे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे विरोधक सरकारच्या अडचणीचे मुद्दे मांडत आहेत. अशातच सभागृहात काही किस्से देखील घडत आहेत, जे चांगलेच चर्चिले जात आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवारच्या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा असून त्यांनी सांगितलेला एक किस्सा तर चवीने चघळला जात आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी या किस्स्यात सांगितलेली व्यक्ती नेमकी कोण?, असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी काय किस्सा सांगितला?

“एकदा एका शाळेत कोणाला मॉनिटर करायचे यावर चर्चा चालू असते. शिक्षण मुलांना काय वाटतं जाणून घेत असतात. एक मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, मी नारायण भंडारीच्या घरुन तंबाखू अन् चुना घेऊन येईन आणि तुम्हाला देईन…. दुसरा मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, मी नारायण भंडारीच्या घरुन अफू-गांजा घेऊन येईन आणि तुम्हाला देईन… तिसरा मुलगा म्हणतो, मी नारायण भंडारीच्या घरुन दारुचा खंबा घेऊन येईन आणि तुम्हाला देईन.”

“शेवटी शिक्षक कोपऱ्यात बसलेल्या एका मुलाला उठवतात आणि तू मॉनिटर झाला तर काय करशील?, असा प्रश्न त्याला विचारतात. तो म्हणतो, मी लवकर उठतो, अंघोळ करतो, देवाला वडिलदाऱ्यांना नमस्कार करतो. जेवण करतो, शाळेत येतो, अभ्यासात लक्ष देतो. घरी गेल्यावर हायपाय धुतो. देवाला नमस्कार करतो आणि अभ्यास करुन झोपी जाईन. शिक्षण एकदम खूश होतात आणि विचारतात बेटा तुझं नाव काय?, तो सांगतो- नारायण भंडारी….

देवेंद्र फडणवीस यांनी हा किस्सा महाविकास आघाडी सरकारसाठी सांगितला, मात्र सरकारमधील नारायण भंडारी कोण त्यांनी सांगितलं नाही. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून हा नारायण भंडारी नेमका कोण?, असा सवाल केला गेला नसता तरच नवल. आता राज्याच्या राजकारणात याच नारायण भंडारीची चर्चा रंगली आहे. चाणाक्ष लोकांना याचं उत्तर मिळालं आहे, मात्र काही जणांना अद्यापही लिंक लागलेली नाही.

थोडक्यात बातम्या-

फडणवीसांना आपल्यावर असलेला विश्वास पाहून अजित पवारांना हसू अनावर

“सेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकलाय”

एक शेतकरी जेव्हा अजय देवगणच्या गाडीपुढे उभा ठाकला, पाहा व्हिडीओ-

पूजा चव्हाण प्रकरणात समोर आला पुणे पोलीस आयुक्तांचा अत्यंत धक्कादायक व्हिडीओ

आणीबाणी ही काँग्रेस सरकारची चुक होती- राहुल गांधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More