बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध, म्हणाले…

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिकात्मक पायी वारी काढली जाणार आहे. मात्र सामान्य वारकऱ्यांना मात्र पायी वारीस मनाई करण्यात आली आहे.

पायी वारीस मनाई असतानाही शासनाचा आदेश झुगारुन पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आलं आहे. मात्र बंडातात्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांनी निषेध व्यक्त केली आहे. वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?  काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान?, असे सवाल देवेंद्र फडणवीसांनी सरकारला केले आहेत.

दरम्यान, बंडातात्यांच्या अटकेनंतर मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे, असं म्हणत भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला.

थोडक्यात बातम्या-

सैराट फ्रेम तानाजीनं केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर तुफान चर्चा

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट; 15 वर्षांचा संसार मोडला

समुद्राच्या मध्यभागी उडाला आगीचा भडका; आग विझवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; महापौरांनी दिली ही महत्वाची माहिती

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More