बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीचा फडणवीसांना पश्चात्ताप, म्हणाले मी पुस्तक लिहून…

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधी सोहळ्याने (Oath Ceremony) राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. या शपथविधी सोहळ्याला दोन वर्ष पुर्ण झाले तरी फडणवीसांच्या मनात या सोहळ्याचा पश्चात्ताप मात्र कायम आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना पहाटेच्या शपथविधी सोहळ्याच्या निर्णयाचा आजही पश्चात्ताप होत असल्याचं बोलून दाखवलं आहे. तर महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार निशाणा साधला आहे.

शिवसेनेनं आमचा विश्वासघात केला. त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केलं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेनेवर निशाणा साधत आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचा घणाघातही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

त्यावेळी काय झालं होतं? कोणी काय केलं होतं पण आम्ही जशास तसं उत्तर देण्याचा विचार केला याचा मला पश्चात्ताप आहे. हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं, अशी खंत फडणवीसांनी बोलून दाखवली आहे. तर मी एक पुस्तक लिहिणार असून त्यात या सर्व घटना नमूद करणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांवर पुन्हा निर्बंध! नियम पुन्हा ‘जैसे थे’च

‘त्या’ व्हायरल डान्स व्हिडीओवर होणाऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

1ली ते 4थी शाळा राहणार बंद?, ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

10 वर्षांच्या प्रवासात पटकावला ट्विटरच्या CEOपदाचा मान! पराग अग्रवाल नेमके आहेत तरी कोण ?

चहाप्रेमींनो सावधान! चहाच्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More