बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आतापर्यंत मी गप्प राहिलो, पण माझं मौन हे कुणी माझी कमजोरी समजू नये”

मुंबई | महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोना लस पुरवठ्यातील तुटवड्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. याला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी प्रत्युत्तर दिलं. हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. आता हर्षवर्धन हर्षवर्धन यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.  आतापर्यंत मी गप्प राहिलो, पण माझं हे मौन कुणी कमजोरी समजू नये, म्हणून मला बोलावं लागतं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात काही ट्विट केले आहेत.

राजकारण करणं हे नेहमीचे सोपं असतं. पण सुशासन आणि आरोग्य सुविधांचे निर्माण ही खरी क्षमतेची परीक्षा असते. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरणाचे नियम कठोरपणे अंमलात येत नाहीत, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. राज्य सरकारला या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी खूप काही करावे लागेल आणि त्यासाठी संपूर्ण मदत करण्याची केंद्राची तयारी आहे. पण राज्य सरकारच्या प्रयत्नांनी काय झाले याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात केवळ सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू नाहीत तर जगातील सर्वाधिक संसर्ग दरसुद्धा महाराष्ट्रात आहे. टेस्टिंगमध्ये अजूनही सुधार व्हायला तयार नाही आणि रुग्णांचे संपर्क शोधण्यात सुद्धा कमतरता आहे असंही फडणवीसांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

उदयनराजे म्हणतात, ‘सध्या राज्यात काय राजकारण चाललंय हे मलाच कळेना’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

“टक्का कुणाला ‘धक्का’ देणार, कुणाची नाव ‘धक्क्या’ला लावणार?”

“…तरच 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार”

‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’; चित्रा वाघ यांचं रूपाली चाकणकरांना प्रत्युत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More