गरज पडल्यास मातोश्रीवर जाईन, त्यामध्ये कमीपणा नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | शिवसेना भाजपमध्ये नक्कीच काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र वेळ आल्यास मी मातोश्रीवर जाईन, त्यात कसलाच कमीपणा नाहीये, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

भाजप सरकारच्या कार्यकाळाला 4 वर्षे पुर्ण होत आहेत, त्या निमित्ताने साम टिव्हीवर मुख्यमत्र्यांनी मुलाखत दिली तेव्हा त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या भूमिकेबद्दल सांगितलं.

मातोश्रीवर जाण्यात कमी पणा काय ? मातोश्रीवर गेल्यामुळे पत्रकार वेगळा अंदाज काढतात. मात्र मातोश्रीवर गेले की तेथे गप्पा होतात, जेवण होते. मातोश्री हे काय जेल आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान,  कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. आमचे दोन उमेदवार लढले तर गोंधळ होऊ शकतो. विभाजनामुळे शिवसेना-भाजपचे नुकसान होऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या-

-साहित्य संमेलन म्हटलं की, What the F*** फिलिंग येते- सचिन कुंडलकर

-अजित पवारांना यापुढे माफी नाही; बीडमध्ये शिवसैनिकांनी अजित पवारांचा पुतळा जाळला!

-उदयनराजेंचा मी राजकीय प्रतिस्पर्धी नाही, मी त्यांचा आदर करतो!

-दिवाळीच्या मुहूर्तावर ‘टेक्नीकल दिवाळी’ लघुपट प्रदर्शित

-28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी; आरोपी गजाआड