राज्यातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे, 12 हजार कोटी गेले कुठे?

राज्यातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे, 12 हजार कोटी गेले कुठे?

मुंबई | राज्यातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे त्यासाठी वापरलेले 12 हजार कोटी रुपये गेले कुठे?, असा खरमरीत सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलाय. 

“15 डिसेंबरपर्यंत राज्यातील खड्डे बुजवण्याची डेडलाईन आहे. त्यामुळे डांबराचा खर्च निम्माच दाखवा आणि पत्रकारांना मॅनेज करा”, हे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहे, असंही ते म्हणाले. 

खड्डे केवळ मातीने भरले जात असून डांबराचे पैसे खाल्ले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केलाय. 

 

Google+ Linkedin