राजे गेले… तरी प्रजा आमच्यासोबत… आम्ही मावळे लढणार- धनंजय मुंडे

मुंबई | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येतोय. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मावळे म्हणून जिगरबाजपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राजे गेले… सेनापती गेले… तरी प्रजा आमच्यासोबत आहे. आता आम्ही मावळे लढणार, अशी खमकी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. काल पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उदयनराजे भाजप सरकारविरोधात आक्रमक दिसून आले. पण आज नेमकं काय झालं? हे कळायला मार्ग नाही, असं ते म्हणाले.

उदयनराजे भोसले यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी का घेतला? ते माहित नाही. रयतेची काळजी असलेले राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढू. नेते पक्ष सोडून चालले आहेत. पण पक्षाच्या कार्यकर्ते आणखी पक्षात आहेत. त्यांच्याच जीवावर राष्ट्रवादी तरेल, असंही ते म्हणाले.

जीएसटी, मंदी, बेरोजगारी या सगळ्या विषयांवर गुरूवारच्या बैठकीत चर्चा झाली. हे सरकार चांगलं काम करत नसल्याचं उदयनराजे म्हणाले होते. मात्र हे सरकार राजकीय भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, 

महत्वाच्या बातम्या-