महाराष्ट्र सविस्तर

मुख्यमंत्र्यांना प्रेमाने सांगतोय, शरद पवारांवर टीका कराल तर…

सोलापूर | मी मुख्यमंत्र्यांना प्रेमाने सांगतो, की तुमचं जेवढं वय नसेल तेवढा पवार साहेबांचा अनुभव आहे, पवार साहेबांवर टीका कराल तर जनता तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.

टेंभुर्णीच्या हल्लाबोल सभेत बोलताना धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. शरद पवारांवर टीका केली तर तुम्ही पुन्हा कधीही राजकारणात दिसणार नाहीत, असं ते म्हणाले. 

हल्लाबोल सभेची ठिणगी यवतमाळमध्ये पडली, आता हा वणवा पश्चिम महाराष्ट्रात येऊन पोहोचला आहे. भाजपनं काय केलं हे सांगण्याची मुख्यमंत्र्यांना काल संधी होती, मात्र ते पवार साहेबांवर टीका करत राहिले, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. 

महत्त्वाच्या बातम्या –

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या