धारकरी आणि वारकऱ्यांमध्ये वादविवाद, पोलिसांची मध्यस्थी

पुणे | संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आणि रायगडावर शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला जाणारे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते समोरासोमर आल्याने पुण्यात वादावादी झाली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ज्ञानोबा माऊलींची पालखी मार्गस्थ झाली.

भिडे गुरुजींचे समर्थक पालखीत घुसल्याचा आरोप करत पालखी सोहळा काही काळ थांबवण्यात आला होता. भिडे गुरुजींच्या समर्थकांना हटवा, अन्यथा पालखी सोहळ्याचा मार्ग बदलू, अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती.

दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण निवळलं आणि पालखी मार्गस्थ झाली. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या