बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माही मार रहा है! सराव सामन्यातच धोनीने मारले अर्धाडझनभर षटकार, पाहा व्हिडीओ

मुंबई | आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांचा थरार बघण्यासाठी काही तासच बाकी आहेत. त्यामुळे आयपीएलचे संघ मैदानावर कसून सराव करताना दिसत आहे. आयपीएलच्या उर्वरीत सामन्यातील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपरकिंग्स आणि मंबई इंडियन्स या संघात होणार आहे. या सामन्याची वाट चाहते पाहत आहे. अशातच काल चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सराव करताना धमाकेदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाचे टेन्शन वाढले आहे.

आयपीएल 14 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने सात पैकी 5 सामने जिंकले आहेत. काल सराव सामन्यात धोनीने आक्रमक फलंदाजी करत तब्बल 10 षटकार ठोकले आहेत. त्यामुळे धोनीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या सामन्यात धोनीने एकापाठोपाठ एक असे 10 गगनचुंबी षटकार ठोकले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स बरोबर होणाऱ्या सामन्यात धोनी कशाप्रकाराची फलंदाजी करणार आहे याची प्रतिक्षा चाहत्यांना लागून आहे.

आयपीएलच्या या हंगामात धोनीने सर्व सामन्यांतून फक्त 37 धावा केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघाची लढत पाहणं प्रेक्षणीय ठरणार आहे. अशातच आता चेन्नई सुपर किंग्सने धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत संघाची ताकद दाखवून दिली आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने 3 वेळा आयपीएलच्या किताबावर कब्जा केला आहे. तर मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा आयपीेएलचा किताब आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार आहे. ते आता पहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आजकालचे क्रिकेटपटू कोणताही मोठा निर्णय….’; विराटच्या कर्णधारपद सोडण्यावरून कपिल देव संतापले!

‘आपण भूतकाळ बदलू शकत नसलो तरी…’; शिल्पाने राज कुंद्रासोबतच्या नात्याबाबत दिले संकेत

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

भाजपला मोठा धक्का, राजकीय संन्यास घेतो म्हणणारे बाबूल सुप्रियो तृणमूलमध्ये!

शिवसेेनेसोबतच्या युतीबाबत राधाकृष्ण विखे-पाटील यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More